Cidco online application portal

नवी मुंबईच्या विकासाबरोबरच सिडकोने स्वातंत्र्योत्तर भारतात एक इतिहास घडविला आहे. देशाच्या नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ही ओळख हा सिडकोचा बहुमानच आहे.

श्री. एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री

द्रष्ट्यांचे अभिमत

नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर विकसित करण्याबरोबरच सिडकोतर्फे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणारे अनेक प्रकल्प साकारण्यात आले आहेत व भविष्यातही साकारण्यात येतील.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री

द्रष्ट्यांचे अभिमत

सिडकोने विकसित केलेले नवी मुंबई शहर हे राज्यालाच नव्हे तर देशालाही भूषणावह ठरले आहे. सिडकोची दूरदृष्टी आणि सूक्ष्म नियोजन यांमुळे सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे.

श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

द्रष्ट्यांचे अभिमत

राज्याच्या विकासामध्ये सिडकोने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे.

श्री. संजय शिरसाट
मा. अध्यक्ष, सिडको

द्रष्ट्यांचे अभिमत

श्री. विजय सिंघल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाद्वारे सिडकोने एक महत्वाकांक्षी पाउल उचलले आहे. हा प्रकल्प शहराला जगातिक नकाशावर स्थापित करेल आणि राज्यासाठी विस्तीर्ण क्षितीज खुले करेल.

श्री. विजय सिंघल
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Shri.Eknath Shinde

सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, कॉर्पोरेट पार्क, इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक नकाशावर मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. नवी मुंबईला एक स्वयंपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून नावारूपास आणण्यामध्ये सिडको महत्वाची भूमिका बजावित आहे.

श्री. एकनाथ शिंदे
मा. मंत्री, नगर विकास आणि सार्वजनिक उपक्रम